माझी न घाई कांहिही, जाणून
आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हां नेण्या तुला माझ्या घरी.
लागेल जन्मावें पुन्हां नेण्या तुला माझ्या घरी.
तूं झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचें
लाजशी;
मी वेंधळा मग सांडतो थोडा चहा बाहीवरी.
मी वेंधळा मग सांडतो थोडा चहा बाहीवरी.
तूं बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढें,
मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती कांहीतरी.
मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती कांहीतरी.
होशी फुलासह फूल तूं अन् चांदण्यासह चांदणे,
- तें पाहणें, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करीं.
- तें पाहणें, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करीं.
म्हणतेस तूं, ” मज आवडे
रांगडा सीधेपणा!”
विश्वास मी ठेवूं कसा या हुन्नरी शब्दावरीं.
विश्वास मी ठेवूं कसा या हुन्नरी शब्दावरीं.
लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें;
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी.
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा