अनुवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अनुवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २५ जुलै, २०१३

शीर्षक.- भरत त्रिवेदी अनुवाद - अलका गांधी असेरकर


 मी एक लांबलचक कविता लिहिली
अन् मग तिला खालून हळू हळू छाटत गेलो.
छाटत गेलो..
शेवटी पार वरपर्यंत पोचलो तर,
माशाच्या डोक्यासारखं
ते चमकदार शीर्षक..!
त्याचे दोन्ही डोळे फाडून म्हणालं..
आता एक तसूभर जरी सरकलास ना पुढे
तर पाहा...तुझी खैर नाही....

-मुळ गुजराती कविता - भरत त्रिवेदी
अनुवाद - अलका गांधी असेरकर