राजा बढे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजा बढे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ४ ऑगस्ट, २०१३

चांदणे शिंपीत जाशी... राजा बढे

चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले
ओंजळी उधळीत मोती हासरी तारा फुले ॥ध्रु.॥

वाहते आकाशगंगा की कटीची मेखला
तेज:पुजाची झळाळी तार पदरा गुंफीले ॥१॥

गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या
जे तुझ्या तालावरी , बोलावरी नादावले ॥२॥

गे निळावंती कशाला झाकशी काया तुझी
पाहुदे मेघाविण सौंदर्य तुझे मोकळे ॥३॥

 
गीतकार:   राजा बढे