सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

सांगा कसं जगायचं?---मंगेश पाडगावकर


सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!

डोळे भरून तुमची आठवण 
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीच ठरवा!

काळ्याकुट्ट काळोखात 
जेंव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन ऊभं असतं
काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीच ठरवा!

पायात काटे रुतून बसतात 
हे अगदी खरं असतं,
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा!

पेला अर्धा सरला आहे 
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा!

सांगा कसं जगायचं
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!

 कवी मंगेश पाडगांवकर

ज्या सुखा कारणे देव वेडावला, संत एकनाथ

ज्या सुखा कारणे देव वेडावला,
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ ||

धन्य धन्य संताचे सदन
तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण || ||

नारायण नारायण नारायण
लक्ष्मी नारायण नारायण नारायण

सर्व सुखाची सुखराशी,
संत चरणी भक्ती मुक्ती दासी

एका जनार्दनी पार नाही सुखा,

म्हणोनी देव भुलले देखा || ||

दत्तनामें पाप पळे---श्री प.पु.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज.

   
 दत्तनामें पाप पळे।मग सर्व विघ्न टळे।
 मग ध्यान राहे मन।अनायासें होय ज्ञान।
 ज्ञाने सर्व पाप नासे।असे दूजे पावन नसे।
 स्वप्नी नाना पापे होती।जागेपणीं ती बाधती
 स्वप्नपापा प्रायश्चित्त जागा होता कोण घेत।
 वासुदेव म्हणे ज्ञान| होता होतो नर पावन।


श्री .पु.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज.

आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा=--लोकगीत

आई अंबे माते तुझा सोनियाचा झुबा
तुझ्या दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा || धृ ||
कोल्हापूरचा राजा राजा फिरतो जत्रेत
फिरतो जत्रेत फुले पडती पदरातआई || ||
आई अंबे माते केस सोनियाच्या तारा
केस सोनियाच्या तारा वैरी कापे थरथरा…. आई || ||
ढोल वाले दादा ढोल वाजव जोरात
ढोल वाजव जोरात आई हसते गालात…. आई || ||
टाळ वाले दादा टाळ वाजव जोमान
टाळ वाजव जोमान अंग भिजल घामान…. आई || ||

अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची ग


अशी चिक मोत्यांची माळ होती  तीस तोळ्याची 
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा  … || धृ ||
ह्या चिक माळेला रेशमी मऊ दार दोरा 
मऊ रेशमांच्या दोऱ्यात नारंगी माळ ओविल  ||  ||
अशी चिक माळेला हिऱ्याचे आठ आठ पदर 
अशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली  ||  ||
मोरया गणपतीला फुलून माळ शोभली 
अशी चिक माळ पाहूनगणपती किती हसला  ||  ||
त्याने गोड हसुनी मोठा आशीर्वाद दिला 
चला चला करूया नमन गणरायाला 

त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला  ||  ||

घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आली गणरायाची--- संत रामदास



घातली रांगोळी गुलालाचीस्वारी आली गणरायाचा || धृ ||
दुर्वा पुष्प बहु प्रिय माळाहार रत्नाचा शोभला …. ||  ||
नैवेघ मोदकाचा केलाप्रसाद वाटुनी काला केला ||  ||
दास म्हणे श्री गणरायामस्तक हे तुमच्या पाया… ||  ||

  

लंबोदर गिरीजा नंदना देवा --संत एकनाथ



पूर्ण करी मनोकामना देवा  || धृ ||
हे मन पावन तव पदी सेवन
बुद्धी द्यावी गजानन देवा || ||
पायी घागुऱ्या वाजती रुणझुण
नाचत यावे गजानन देवा … || ||
एका जनार्दनी विनवितो तुज
विद्या द्यावी गजनना देवा … || ||