पांढर्या शुभ्र हत्तींचा , रानातून कळप
निघाला
संपूर्ण गर्द शोकाच्या गर्तेतही मिसळून गेला
त्या गुढ उतरत्या मशिदी , पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडत्या पंखात लपेटुन बुडाल्या
पांढर्या शुभ्र हत्तींनी मग दोंगर उचलून धरले,
अन् तसे काळजा खाली अस्तींचे झुंबर फुटले
पांढरे शुभ्र हत्ती , अंधारबनातून गेले,
ते जिथे थांबले होते, ते वृक्षही पांढरे झाले
- “संध्याकाळच्या कविता”, ग्रेस

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा