कृपाळे स्नेहाळे -- संत गुलाबराव महाराज
कृपाळे स्नेहाळे जाण त्या पामरा
तुजवीण थारा नाही नाही
निर्धना सधना कृपणा उदारा
तुजवीण थारा नाही नाही
पोळल्या खेळल्या कुश्चला सुंदरा
तुजवीण थारा नाही नाही
आळंदी वल्लभा स्वामी ज्ञानेश्वरा
तुजवीण थारा नाही नाही
संत गुलाबराव महाराज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा