बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

प्रीत लपवुनी लपेल का ----- ग. दि.मा .

लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छ्पेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?

जवळ मने पण दूर शरीरे
नयन लाजरे, चेहरे हसरे
लपविलेस तू जाणून सारे
रंग गालिचा छ्पेल का ?

क्षणात हसणे, क्षणात रुसणे
उन्हात पाउस, पुढे चांदणे
हे प्रणयाचे देणे घेणे
घडल्यावाचुन चुकेल का ?

पुरे बहाणे गंभिर होणे
चोरा, तुझिया मनी चांदणे
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे
केली चोरी छ्पेल का
?



गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - प्रभाकर जोग
स्वर - मालती पांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा