झाडाखाली बघुनी सावली बसतो चांभार |
ठाऊक
मजला आहे त्याचा
सर्व कारभार ||
आरी घेऊन देई शिवुनी जोडे तुटलेले |
टाच सांधणे नाल
जोडणे सर्वकाळ
चाले ||
रापी याची लखलख करीत चराचरा चाले |
धूर विडीचा मधून
केव्हा खुशालीत
बोले ||
वेळ मिळीतो शिवीत राही नवा बूट काही |
विकेल
तेव्हा मिळेल पैसा मनात
हर्ष आहे||
पोचे येउन जुने झाले डबके पाण्याचे |
तेच परंतू सोबत
करते प्रामाणिक
कसे ||
केस पांढरे जरी जाहले हाथ चालतात |
तुटलेले पायतान
कोणाचे नेत्र
शोधतात ||
धंदा याचा पायतानाचा जरी |
नवे पायतान कधी न घातले याने पायात ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा