सोमवार, ४ डिसेंबर, २०२३
कांचनसंध्या. बा. भ. बोरकर
रविवार, १४ मे, २०२३
ज्यांची हृदये झाडांची -मंगेश पाडगावकर
बुधवार, १० मे, २०२३
पाऊस आला. ग्रेस
रविवार, ४ डिसेंबर, २०२२
माया महा ठगनी हम जानी, कबीर
तिरगुन फांस लिए कर डोले बोले मधुरे बानी,
केसव के कमला वे बैठी शिव के भवन भवानी,
पंडा के मूरत वे बैठीं तीरथ में भई पानी,
योगी के योगन वे बैठी राजा के घर रानी,
काहू के हीरा वे बैठी काहू के कौड़ी कानी,
भगतन की भगतिन वे बैठी ब्रह्मा के ब्रह्माणी,
कहे कबीर सुनो भई साधो यह सब अकथ कहानी।
शनिवार, १० सप्टेंबर, २०२२
स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या भक्तांना वेळोवेळी लिहीलेली पत्रे* *पत्र क्र. २५) भाग २*
मंगळवार, ७ जून, २०२२
उपयोग काय त्याचा ? विंदा .
शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२
उरल्या सुरल्या ओलाव्यावर. शांता शेळके
शनिवार, १२ जून, २०२१
सांगावे, कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे,
सांगावे, कवण्या ठाया जावे, कवणा ते स्मरावे,
कैसे काय करावे, कवण्या परि मी रहावे |
कवण येउन, कुरुंद-वाडी, स्वामी ते मिळवावे, सांगावे ||धृ||
या हारि, जेवावे व्यवहारी, बोलावे संसारी,
घालूनी अंगिकारी, प्रतीपाळीसि जो निर्धारी,
केला जो निज निश्चय स्वामी कोठे तो अवधारी, सांगावे ||१||
या रानी, माझी करुणावाणी, काया कष्टील प्राणी,
ऐकुनी घेशील कानी, देशील सौख्य निदानी,
संकट होउनि, मूर्च्छित असता, पाजील कवण पाणी, सांगावे ||२||
त्यावेळा, सत्पुरुषांचा मेळा, पहातसे निज डोळा,
लावति भस्म कपाळा, सांडी भय तू बाळा,
श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती, अभय तुज गोपाळा, सांगावे ||३||
*********:
नारायण स्वामींचे शिष्य गोपाळ यांनी लिहलेले पद.
गुरूविरहाने कासाविस झालेल्या शिष्याचे हे मनोगत आहे.
हे गु्रुदेव मला सांगा मी कुठे जावू.कुणाला स्मरू.काय करू. कसे राहू। कसे येवून कुरुंदवाडीला स्वामीला भेटू.मिळवू . (नरसोबा वाडी)
याजगात संसारात व्यवहारी जगण्यात खाणे पिणे उठणे निजणे हे घडतच आहे.पण मला आपल्या जवळ घेवून माझा भार उचलणारा, पालन करणारा, तसे वचन देणारा स्वामी कुठे आहे?
मी या संसार रूपी अरण्यात अडकलो आहे.आणि अतिशय दु खीकष्टी झालो आहे . दु:खात मी रडत आहे ,ओरडत आहे, हाका मारत आहे ही माझी करूणावाणी कोण ऐकेल ?आणि मला सुख देईल. दु खाने, तहानेने मी मुर्छित होऊन, बेशुद्ध होऊन पडलेलो असताना मला येऊन कोण बरे पाणी पाजील?
त्याचवेळी मी सत्पुरुषांचा समूह या माझ्या डोळ्यांनी पाहिला ते जवळआले त्यांनी माझ्या कपाळाला भस्म लावले आणि सांगितले हे गोपाळा तू भय सांडून दे.
हे सत्पुरुष म्हणजे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ होते .त्यानी या गोपाळला अभय दिले.
शुक्रवार, ४ जून, २०२१
दत्ता मजला प्रसन्न।होसी जरी तू वर देसी
रविवार, ३० मे, २०२१
श्री_समर्थ_रामदासस्वामी_यांची_गाथा_अभंग_ क्र.१३
शुक्रवार, १४ मे, २०२१
घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा
बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०
कृष्णजन्म रचना.... गदिमा
मंगळवार, ९ जून, २०२०
खवळून उठले साती सागर
सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०
आधी गणाला रणी आणला गीतकार :- शाहीर पठ्ठे बापूराव ,
आधी गणाला रणी आणला
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना ,
धन्य शारदा ब्रह्म नायका ,
घेऊन येईल रूद्रविणा ,
साही शास्रांचा मंत्र अस्रांचा ,
दाविला यंत्र खुणाखुणा ,
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना ,
सद्गुरू माझा स्वामी जग्दगुरु,
मेरूवरचा धुरू आणाआणा .
ब्रह्मांड भवता तो एक सवता ,
दिवाच लाविला म्हणाम्हणा ,
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना .
माझा मनाचा मी तू पणाचा ,
जाळून केला चुनाचुना ,
पठ्ठेबापूराव कवी कवनाचा ,
हा एक तुकडा जुनाजुना ,
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना .
गीतकार :- पंचरंगी शाहीर पठ्ठे बापूराव ,
या डोळ्यांची दोन पाखरे..गीतकार : ग. दी. माडगुळकर
फिरतिल तुमच्या भवती
पाठलाग ही सदैव करतील
असा कुठेही जगती..
दर्शन तुमचे हाच असे हो
या पक्ष्यांचा चारा
सहवासाविण नकोच यांना
अन्य कोठचा वारा
तुमचा परिसर यांस नभांगण,
घरकुल तुमची छाती...
सावलीतही बसतिल वेडी
प्रीतीच्या दडुनी
एका अश्रुमाजी तुमच्या
जातील पण बुडुनी
नव्हेत डोळे, नव्हेत पक्षी,
ही तर अक्षय नाती..
..गीतकार : ग. दी. माडगुळकर
मागते मन एक काही , गीतकार :- शांता शेळके
मागते मन एक काही ,
दैव दुसरे घडविते .
उमलल्या आधीच कैसे ,
फुल पायी तुडविते !
खेळ नियती खेळते की
पाप येते हे फळा ,
वाहाणा-या या जळाला
कोणी मार्गी आडविते ,!
ईश्वरेच्छ हीच किंवा
संचिताचा शाप हा ,
चंद्ररेखा प्रतिपदेची
कोण तिमिरी बुडविते ,
मागते मन एक काही , ,,.,..
गीतकार :- शांता शेळके ,
मी सोडून सारी लाज, : सुधीर मोघे,
अशी बेभान नाचले आज
की घुंगरु तुटले रे,
घुंगरु तुटले रे
बहरली वीज देहांत,
उतरले प्राण पायांत
वार्याचा धरुनी हात,
अशी बेभान नाचले आज की...
मन वेडे तेथे जाय,
ते जवळी होते हाय
अर्ध्यात लचकला पाय,
तरी बेभान नाचले आज की...
गीतकार : सुधीर मोघे,
सांगा, मुकुंद कुणी हा पाहिला? गीतकार :- होनाजी बाळ
रासक्रीडा करिता वनमाळी, हो
सखे होतो आम्ही विषयविचारी
टाकुनि गेला तो गिरिधारी
कुठे गुंतून बाई हा राहिला?
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?
गोपी आळविती हे ब्रजभूषणा हे
वियोग आम्हालागी तुझा ना साहे
भावबळे वनिता व्रजाच्या हो
बोलावुनि सुतप्रती नंदजीच्या
प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या
म्हणे होनाजी देह हा वाहिला
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?
गीतकार :- होनाजी बाळ
सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०
डोळ्यांत सांजवेळी: मंगेश पाडगांवकर
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी
मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी
सहज तुला गुपित एक सांगते दुपारी .....अशोकजी परांजपे,
डोळियांत आली गडे प्रीत माझी लाजरी
अंगणांत बहरते रानजाई देखणी
जाई खाली उभा असे हासरा शिकारी
सोडते ग धारेसाठी, ओढ घेई वासरू
गोठ्यामध्ये दिसे सखे, सावळा मुरारी
अंतरात कोणसे, हळुच बाई बोलले
ओढळले मन नेई माझिया सासरी
