होनाजी बाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
होनाजी बाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

सांगा, मुकुंद कुणी हा पाहिला? गीतकार :- होनाजी बाळ

सांगा, मुकुंद कुणी हा पाहिला?
रासक्रीडा करिता वनमाळी, हो
सखे होतो आम्ही विषयविचारी
टाकुनि गेला तो गिरिधारी

कुठे गुंतून बाई हा राहिला?
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?
गोपी आळविती हे ब्रजभूषणा हे
वियोग आम्हालागी तुझा ना साहे
भावबळे वनिता व्रजाच्या हो

बोलावुनि सुतप्रती नंदजीच्या
प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या
 म्हणे होनाजी देह हा वाहिला
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?
 
गीतकार :- होनाजी बाळ