आशा भोसले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आशा भोसले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १४ मे, २०१४

समईच्या शुभ्र कळ्या: आरती प्रभू

समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते;
केसातच फुललेली जाई पायांशी पडते. ॥धृ.॥

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे;
मागे मागे राहिलेले माझे माहेरे बापुडे. ॥१॥

साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची;
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची. ॥२॥

थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये;
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन ग ये. ॥३॥

हसशील, हास मला, मला हसूही सोसेना;
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा ! ॥४॥

गीत : आरती प्रभू
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले