जगदीश खेबूडकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जगदीश खेबूडकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २६ जानेवारी, २०२०

चंद्र आहे साक्षीला...जगदीश खेबूडकर,

पान जागे फूल जागे,
भाव नयनीं जागला
चंद्र आहे साक्षीला,
चांदण्यांचा गंध आला
पौर्णिमेच्या रात्रीला
चंद्र आहे साक्षीला, 


स्पर्श हा रेशमी,
हा शहारा बोलतो
सूर हा, ताल हा,
जीऽऽव वेडा डोऽऽलतो
रातराणीच्या फुलांनी
देह माझा चुंबिला !
चंद्र आहे साक्षीला, 


लाजरा, बावरा,
हा मुखाचा चंद्रमा
अंग का चोरीसी
दो जिवांच्या संगमा
आज प्रीतीने सुखाचा
मार्ग माझा शिंपिला !
चंद्र आहे साक्षीला,

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना ....... गीतकार : जगदीश खेबुडकर,

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना 


तुझ्या जीवनी नीतीची जाग आली
माळरानी या प्रीतीची बाग आली

सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा 

तुझा शब्द की थेंब हा अमृताचा 
तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा
उगा लाजण्याचा किती हा बहाणा 


चिरंजीव होई कथा मिलनाची
तृषा वाढते तृप्त या लोचनांची
युगांचे मिळावे रूप या क्षणांना



गीतकार : जगदीश खेबुडकर,

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले.... गीतकार - जगदीश खेबुडकर.


ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरू दिसले

माय उभी ही गाय हो‍उनी, 
पुढे वासरू पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले

चरण शुभंकर फिरता तुमचे, 
मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटामधुनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले

तुम्हीच केली सारी किमया, 
कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर वसले


 गीतकार - जगदीश खेबुडकर.

गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

धुंद एकांत हा गीत - जगदीश खेबूडकर




धुंद एकांत हा, प्रीत आकारली
सहज मी छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा
जाण नाही मला प्रीत आकारली
सहज तू छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा

गंधवेडी कुणी, लाजरी बावरी
चांदणे शिंपिते चैत्रवेलीवरी
यौवनाने तिला आज शृंगारली
सहज मी छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा


गोड संवेदना अंतरी या उठे
फूल होता कळी, पाकळी ही मिटे
लोचनी चिंतनी मूर्त साकारली
सहज मी छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा

रोमरोमांतुनी गीत मी गाइले
दाट होता धुके स्वप्न मी पाहिले
पाहता पाहता रात्र मंथारली
आज बाहुत या, लाज आधारली
सहज तू छेडीता तार झंकारली

 संगीत - सुधीर फडके
स्वर आशा भोसले,सुधीर फडके
चित्रपट - अनोळखी