पी. सावळाराम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पी. सावळाराम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

देव जरी मज कधी भेटला, पी. सावळाराम,


देव जरी मज कधी भेटला, 
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे 

जीवन देई मम बाळाला
कृष्णा गोदा स्नान घालु दे, 
रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी 

मुक्ताई निजवु दे तुजला
शिवरायाच्या मागीन शौर्या, 
कर्णाच्या घेईन औदार्या
ध्रुव-चिलयाच्या अभंग प्रेमा 

लाभु दे चिमण्या राजाला

 पी. सावळाराम,

हसले आधी कुणी ------------ पी. सावळाराम



हसले आधी कुणी? तू का मी?
सहज तुला मी रे सख्या पाहिले
तू बघता मी ग तुला पाहिले
त्या पाहण्याचे वेड लागता
त्या वेडाचा तू अर्थ सांगता
हसले आधी कुणी? तू का मी?

अवचित तुझी रे भेटची होता
पदर सावरी ढळला नसता
बिजलीपरी मी निघुनी जाता
मागे वळुनी तू हळूच पाहता
हसले आधी कुणी? तू का मी?
नाही भेटले बळेची तुजला
कळले सखये जेव्हा मजला
परस्परांवरी रुसता-फुगता
जवळ येऊनी दूरची सरता
हसले आधी कुणी? तू का मी?


 पी. सावळाराम