भावगीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भावगीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

मी कशाला आरशात पाहु ग ...ऋषि राज


मी कशाला आरशात पाहु ग
मी कशाला बंधनात राहु ग
मीच माझा रुपाची राणी ग
वारा भारी खट्याळ
असा वाहे झुळझुळ
उडवी बटा कशा
ग बाई ,आवरू तरी कशा
वैरी ,झोंबे असा अंगा
कशी साहू ग
मी कशाला आरशात पाहु ग
झाडवेली जोडीने
बघतात निरखून
माझ्याकडे कशा
ग बाई ,जीव हो वेडापिसा
वाटे ,जावे तसे निघुन
कशी जाऊ ग
मी कशाला आरशात पाहु ग
प्राजकताच्या छायेत
फुलांची ही बरसात
भिजले तयात मी
ग सुख हे ,अथांग कि
गाने ,उसळे देहात
कशी गऊ ग
मी कशाला आरशात पाहु ग
मी कशाला बंधनात राहु ग
मीच माझा रुपाची राणी ग


ऋषि राज

शनिवार, ७ डिसेंबर, २०१९

लपविलास तू हिरवा चाफा,


लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा छपेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?
जवळ मने पण दूर शरीरे
नयन लाजरे, चेहरे हसरे
लपविलेस तू जाणून सारे
रंग गालिचा छपेल का ?
क्षणात हसणे, क्षणात रुसणे
उन्हात पाउस, पुढे चांदणे
हे प्रणयाचे देणे-घेणे
घडल्यावाचुन चुकेल का ?
पुरे बहाणे गंभिर होणे
चोरा, तुझिया मनी चांदणे
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे
केली चोरी छपेल का ?

मान वेळावुनी धुंद बोलू नको == मंगेश पाडगावकर


मान वेळावुनी धुंद बोलू नको
चालताना अशी वीज तोलू नको
ऐक माझे जरा, हट्ट नाही खरा
दृष्ट लागेल ग दृष्ट लागेल ग

आज वारा बने रेशमाचा झुला
ही खुशीची हवा साद घाली तुला
मोर सारे तुझे, हे पिसारे तुझे
रूप पाहून हे चंद्र भागेल ग

पाहणे हे तुझे चांदण्याची सुरी
हाय मी झेलली आज माझ्या उरी
लाट मोठी फुटे, शीड माझे कुठे ?
ही दिशा कोणती ? कोण सांगेल ग ?


   मंगेश पाडगावकर

लाजून हासणे अन् हासून

लाजून हासणे अन् हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे


डोळ्यांस पापण्यांचा
का सांग भार व्हावा?
मिटताच पापण्या अन् का
चंद्रही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे हरती
जिथे शहाणे' ........     मी ओळखून

हाती धनुष्य ज्याच्या
त्याला कसे कळावे?
हृदयात बाण ज्याच्या
त्यालाच दुःख ठावे!
तिरपा कटाक्ष भोळा,
आम्ही इथे दिवाणे........  मी ओळखून




जाता समोरुनी तू उगवे
टपोर तारा
देशातुनी फुलांच्या
आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्याचे
सुचते सुरेल गाणे--------  मी ओळखून

बुधवार, १४ मे, २०१४

अजुनी रुसून आहे,

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! ॥धृ.॥

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना ! ॥१॥

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ! ॥२॥

की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ॥३॥

गीतकार : आ. रा. देशपांडे
संगीतकार :कुमार गंधर्व
गायक :कुमार गंधर्व