सुधांशु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुधांशु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

देव माझा विठू सावळा .................गीतकार : सुधांशु,

देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा 


विठू राहे पंढरपुरी, 
वैकुंठच हे भूवरी
भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा 


साजिरे रूप सुंदर, 
कटी झळके पीतांबर
कंठात तुळशीचे हार, कस्तुरी टिळा 


भजनात विठू डोलतो, 
कीर्तनी विठू नाचतो
रंगून जाई भक्तांचा पाहुनी लळा


 गीतकार : सुधांशु,