बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

सखी मंद झाल्या तारका, सुधीर मोघे

सखी मंद झाल्या तारका, 
आता तरी येशील का ?
मधुरात्र मंथर देखणी, 

आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, 

त्या अर्थ तू देशिल का ?
हृदयात आहे प्रीत अन् 
ओठांत आहे गीत ही
ते प्रेमगाणे छेडणारा, 

सूर तू होशिल का ?
जे जे हवे ते जीवनी, 
ते सर्व आहे लाभले
तरी ही उरे काही उणे, 

तू पूर्तता होशिल का ?
बोलावल्यावाचूनही 
मृत्यू जरी आला इथे
थांबेल तो ही पळभरी, 

पण सांग तू येशिल का ?

सुधीर मोघे

फिरत्या चाकावरती देशी गीतकार - ग. दि. माडगुळकर

फिरत्या चाकावरती देशी
फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार

माती पाणी उजेड वारा
तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार

घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार

तूच घडविशी तूच फोडीशी
कुरवाळीशी तू तूच तोडीशी
न काळे यातून काय जोडीशी
देसी डोळे परी निर्मिसी तयांपुढे अंधार

तू वेडा कुंभार विठ्ठला
तू वेडा कुंभार



गीतकार - ग. दि. माडगुळकर

देव जरी मज कधी भेटला, पी. सावळाराम,


देव जरी मज कधी भेटला, 
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे 

जीवन देई मम बाळाला
कृष्णा गोदा स्नान घालु दे, 
रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी 

मुक्ताई निजवु दे तुजला
शिवरायाच्या मागीन शौर्या, 
कर्णाच्या घेईन औदार्या
ध्रुव-चिलयाच्या अभंग प्रेमा 

लाभु दे चिमण्या राजाला

 पी. सावळाराम,

हसले आधी कुणी ------------ पी. सावळाराम



हसले आधी कुणी? तू का मी?
सहज तुला मी रे सख्या पाहिले
तू बघता मी ग तुला पाहिले
त्या पाहण्याचे वेड लागता
त्या वेडाचा तू अर्थ सांगता
हसले आधी कुणी? तू का मी?

अवचित तुझी रे भेटची होता
पदर सावरी ढळला नसता
बिजलीपरी मी निघुनी जाता
मागे वळुनी तू हळूच पाहता
हसले आधी कुणी? तू का मी?
नाही भेटले बळेची तुजला
कळले सखये जेव्हा मजला
परस्परांवरी रुसता-फुगता
जवळ येऊनी दूरची सरता
हसले आधी कुणी? तू का मी?


 पी. सावळाराम

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी :==== ग.दि.मा.

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,||धृ||

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी,

एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,||१

महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया,

गोठविनारा नको कडाका नको उन्हाचि होळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी..||२

होते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,
सौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा

अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. ||३


 ग.दि.मा.

ऐन दुपारी, यमुनातीरी,गीत - ग. दि. माडगूळकर


 ऐन दुपारी, यमुनातीरी, 

खोडी कुणी काढली
बाई माझी करंगळी मोडली

जळी वाकुन मी घट भरताना
कुठुन अचानक आला कान्हा
गुपचुप येऊनी पाठीमागुनी, 

माझी वेणी ओढली
समोर ठाके उभा आडवा
हातच धरला माझा उजवा
मीही चिडले, इरेस पडले, 

वनमाला तोडली

 गीत - ग. दि. माडगूळकर

डोळ्यांत सांजवेळी ..मंगेश पाडगांवकर


डोळ्यांत सांजवेळी
आणूनकोस पाणी
त्या दूरच्यादिव्यांना 
सांगू नकोकहाणी

कामांत गुंतलेले
असतीलहात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू
माझी उदास गाणी

वाटेवरी खुणेच्या शोधू
नको फुले ती
ना ठेविते फुलांची
मातीइथे निशाणी

कळणार हाय नाही
दुनियातुला मला ही
मी पापण्यांत माझ्या
हीझाकिली विराणी

 .मंगेश पाडगांवकर