रविवार, २१ जुलै, २०१३

माझिया प्रियाला प्रीत कळेना--उमाकांत काणेकर

माझिया प्रियाला प्रीत कळेना
अनुराग त्याचा माझा, हाय रे जुळेना

पावसात भिजतो श्रावण, सुखाचा महिना
आवरू मनाला कैसे मला ते जमेना
मुकी नेत्रभाषा त्याला कळूनी वळेना

यौवनात सुकते काया, दुःख आवरेना
वेदना उरीची छेडी मुक्या भावनांना
स्पर्श गोड अजूनी त्याचा सुखाचा मिळेना

वसंतात नाही बोले, श्रावणात नाही
कठोरास माझ्या मनिचे कळेनाच काही
रात रात शिणती डोळे, पापणी ढळेना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा