आला शिशिर संपत
पानगळती सरली,
ऋतुराजाची चाहूल
झाडावेलीना लागली.
देवचाफा हा पहा ना
अंगोपांगी बहरला,
मोगराही कोवळ्याशा
पाने सजाया लागला.
डोळे खिळविती माझे
जास्वंदीची लाल फुले,
बहाव्याने येथे तेथे
सोनतोरण बांधिले.
'कुहू' गाऊन कोकिळा
करी वसंत-स्वागत,
तिलाही मी विनविते
शिकव ना मला गीत.
-इंदिरा संत
निसर्ग नियम व स्त्री सुलभ भावना ची सुंदर गुंफण या कवितेत आहे .
उत्तर द्याहटवाजून्या ४थी मराठी पाठ्यक्रमातील 'ईथे' ही कविता वाचायला मिळेल ?
उत्तर द्याहटवासंतोष, वाह सुंदर परीक्षण
उत्तर द्याहटवा