बुधवार, १५ जानेवारी, २०२०

दिस नकळत जाई .......सौमित्र

दिस नकळत जाई 
सांज रेंगाळून राही
क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही ...
दिस नकळत जाई -२

भेट तुझी ती पहिली लाख लाख आठवतो
रूप तुझे ते धुक्याचे कण कण साठवतो
वेड सखे साजणी हे -२
मज वेडावून जाई
क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही ...
दिस नकळत जाई -२
असा भरून ये उर जसा वळीव भरावा -२
अशी हुरहूर जसा गंध रानी पसरावा
रान मनातले माझ्या -२
मग भिजुनिया जाई
क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही ...
दिस नकळत जाई -२
आता अबोध मनाची अनाकलनीय भाषा -२
जशा गूढ गूढ माझ्या तळहातावर रेषा
असे आभाळ असे आभाळ -२
रोज पसरून राही
क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही ...
दिस नकळत जाई -२
सांज रेंगाळून राही
क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही ...
दिस नकळत जाई -२
दिस नकळत जाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा