इवल्या इवल्याशा , टिकल्या-टिकल्यांचे
देवाचे घर बाइ , उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
निळी निळी वाट , निळे निळे घाट
निळ्या निळ्या पाण्याचे झुळझुळ पाट
निळ्या निळ्या डोंगरात निळी निळी दरी
चांदीच्या झाडांना सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे
सोन्याची केळी , सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी
देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊ मऊ ढगांची अंथरली गादी
चांदण्यांची हंडी , चांदण्यांची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी
गीत - ग. दि. माडगूळकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा