रविवार, २४ जुलै, २०१६

एका तळ्यात - ग.दि.माडगूळकर






एका तळ्यात होती बदले पिले सुरेख

होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥

कोणी न त्यास घेई खेळावयास संगे

सर्वाहूनि निराळे ते वेगळे तरंगे

दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक

आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥

पिल्लस दु:ख भारी भोळे रडे स्वत:शी

भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी

जे ते तयास टोची दावी उगाच धाक

होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ॥

एकेदिनी परंतु पिल्लास त्या कळाले

भय वेड पार त्याचे वार्‍यासवे पळाले

पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक

त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक ||

 ग.दि.माडगूळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा