ज्या सुखा कारणे देव वेडावला,
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला ||
धृ ||
धन्य धन्य संताचे सदन
तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण ||
१ ||
नारायण नारायण नारायण
लक्ष्मी नारायण नारायण नारायण
सर्व सुखाची सुखराशी,
संत चरणी भक्ती मुक्ती दासी
एका जनार्दनी पार नाही सुखा,
म्हणोनी देव भुलले देखा || २ ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा