अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग … || धृ ||
ह्या चिक माळेला रेशमी मऊ दार दोरा ग
मऊ रेशमांच्या दोऱ्यात नारंगी माळ ओविल ग || १ ||
अशी चिक माळेला हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली ग || २ ||
मोरया गणपतीला फुलून माळ शोभली ग
अशी चिक माळ पाहून, गणपती किती हसला ग || ३ ||
त्याने गोड हसुनी मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन गणरायाला ग
त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला ग || ४ ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा